Ratnagiri BJP Appointments: रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील विविध मंडळांचे प्रभारी जाहीर; चिपळूणसह अनेक जबाबदाऱ्यांचे वाटप

Ratnagiri BJP Appointments: रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील विविध मंडळांचे प्रभारी जाहीर; चिपळूणसह अनेक जबाबदाऱ्यांचे वाटप

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहीर केली यादी; पक्ष संघटना बळकट करण्यावर भर

Ratnagiri BJP Appointments संदर्भात महत्त्वाची घोषणा झाली असून, भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील विविध मंडळांच्या प्रभारी पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जाहीर झालेल्या यादीनुसार, रत्नागिरी शहर प्रभारीपदी सचिन वहाळकर, रत्नागिरी दक्षिण प्रभारीपदी अशोक मयेकर, रत्नागिरी उत्तर प्रभारीपदी दत्ता देसाई, रत्नागिरी मध्य प्रभारीपदी सतीश शेवडे, लांजा-राजापूर प्रभारीपदी अमित केतकर आणि संगमेश्वर प्रभारीपदी प्रमोद अघटराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ratnagiri BJP Appointments: चिपळूण शहर व ग्रामीणची जबाबदारी कोणाकडे?
या नियुक्त्यांमध्ये चिपळूण तालुक्यातील दोन्ही मंडळांच्या प्रभारी पदांचाही समावेश आहे. त्यानुसार चिपळूण ग्रामीण प्रभारीपदी सौ. स्वप्ना प्रशांत यादव, तर चिपळूण शहर प्रभारीपदी मधुकर निमकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Shanti real estate 1

संघटनात्मक कामकाजाला गती देण्याचा विश्वास
जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक भक्कम करणे, पक्षाची विचारधारा व कार्यपद्धती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच संघटनात्मक कामकाजाला गती देणे, यासाठी हे नवनियुक्त प्रभारी मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी व्यक्त केला आहे.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अभिनंदन केले असून, त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.