ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोन वासरे आणि एक गाय सुरक्षित; १.६० लाखांचे नुकसान
मंडणगड (प्रतिनिधी): Mandangad Dahagaon Cattle Shed Fire Loss च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मौजे दहागाव निमदेवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. या भीषण आगीत दोन दुभत्या गाईंचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, गोठा आणि पशुधनाचे मिळून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
Mandangad Dahagaon Cattle Shed Fire Loss: ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोन वासरे अन् एक गाय सुरक्षित
ही दुर्दैवी आग महेंद्र रामचंद्र चव्हाण व नीलेश रामचंद्र देवरुखकर यांच्या संयुक्त गुरांच्या गोठ्याला लागली. घटनेच्या वेळी गोठ्यामध्ये दोन गाई आणि दोन वासरे बांधलेली होती. आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जिवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांमुळे दोन वासरे आणि एका गाईला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने दोन दुभत्या गाईंना वाचवता आले नाही. या आगीत गोठ्यालगत असलेली लाकडाची खोपीदेखील पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
महसूल विभागाकडून १ लाख ६० हजार रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच मंडणगडचे महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूश, सरपंच मंगेश दळवी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्यानुसार, गोठ्याचे अंदाजे ८० हजार रुपये आणि दोन मयत गाईंचे ८० हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बाधित पशुपालकांना शासकीय मदतीची अपेक्षा
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे महेंद्र चव्हाण आणि नीलेश देवरुखकर या दोन्ही पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले पशुधन गमावल्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने व शासनाने पीडित पशुपालकांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 08-10-2026














