ZP Employee Delhi Protest March: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा १२ डिसेंबरला दिल्लीत महामोर्चा

रत्नागिरीतून २०० हून अधिक कर्मचारी होणार सहभागी

रत्नागिरी : ZP Employee Delhi Protest March अंतर्गत न्याय्य हक्कांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने दिल्लीत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २०० हून अधिक कर्मचारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ZP Employee Delhi Protest March: रामलीला मैदानावर धडकणार महामोर्चा

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक रामलीला मैदान येथे या महामोर्चाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या १३२ व्या घटक संघटनेसह राज्यातील सर्व ३४ जिल्हा शाखा या मोर्च्यात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय संवर्गातील कर्मचारी यात सहभागी होत असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश सुतार, कार्याध्यक्ष सुरेंद्र वाकडे आणि सचिव प्रवीण चिपळूणकर यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

Happy journey english

या महामोर्चाच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत:

रिक्त पदे व कंत्राटी पद्धत: राज्य शासनाचे विविध विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांतील सर्व रिक्त पदे नियमितपणे भरावीत व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे.

लेबर कोड व वेतन आयोग: कामगारविरोधी ४ लेबर कोड (श्रम संहिता) रद्द करावेत आणि दर पाच वर्षांनी वेतन आयोग व वेतन सुधारणा लागू करावी.

जुन्या पेन्शनची मागणी: PFRDA कायदा रद्द करून NPS व UPS समाप्त करावे आणि जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत लागू करावी.

खासगीकरण व शाळा धोरण: सरकारी विभागांचे कंत्राटीकरण, सार्वजनिक उपक्रमांचे निगमीकरण/खासगीकरण थांबवावे; सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण थांबवून अनिवार्य टेट (TET) आदेश मागे घ्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 08-10-2026