‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत पाणी अडविण्याचा शुभारंभ
लांजा : Indavati Village Check Dam Construction अंतर्गत सेवा संकल्प अभियानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा इंदवटी नं. १ व जि. प. शाळा इंदवटी सुतार यांनी इंदवटी भगतेवाडी व मुचकुंदी जाधववाडी येथे विजयी बंधारे बांधून पाणी अडविण्याचा शुभारंभ केला आहे.
Indavati Village Check Dam Construction: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने, पाणी बचतीची गरज ओळखून लांजा पंचायत समिती विभागाने बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंदवटी गावातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्रित येत हे बंधारे बांधले.
ग्रामस्थ, शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा सहभाग
बंधारे उभारण्यात इंदवटी नं. १ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती भगते, इंदवटी सुतार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग घडशी, दत्ताराम जाधव (पाटील), दर्शना मांडवकर, प्रकाश पांचाळ, श्रद्धा पांचाळ, वसंत इंदवटकर, रुपेश भगते, अंगणवाडी सेविका विद्या गोसावी, वंदना इंदवटकर, सुदेश पालकर, शिवाजी जाधव, दीपक भगते, देवेंद्र भगते, ग्रामसेविका प्राजक्ता कदम, इंदवटी नं. १ चे मुख्याध्यापक गजेंद्र पांढरे, इंदवटी सुतारचे मुख्याध्यापक महेश गुरव, शिक्षक विश्वजीत कांबळे आणि महेश कोळी यांनी पुढाकार घेतला.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
या स्तुत्य उपक्रमास गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले व खावडी केंद्रप्रमुख उमेश केसरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले यांनी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व शिक्षकांचे कौतुक केले. हे बंधारे भूजल पातळी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असे सांगून त्यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 08-10-2026














