Ratnagiri Crime News: फगरवठार पोलीस लाईन परिसरात नंबर प्लेट नसलेली संशयास्पद पल्सर जप्त; भंगार व्यावसायिकाला पोलिसांकडून अटक

वाहनाची कागदपत्रे नसल्याने शहर पोलिसांची कारवाई

Ratnagiri Crime News अंतर्गत रत्नागिरी शहरातील फगरवठार पोलीस लाईन परिसरात नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद पल्सर मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल सुरेश जगताप (वय २४, व्यवसाय- भंगार खरेदी-विक्री/फिरस्ते, रा. स्टेट बँक कॉलनी, साळवी स्टॉप झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भालचंद्र दिलीप मयेकर फगरवठार परिसरात गस्तीवर असताना, त्यांना पुढील नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची पल्सर गाडी दिसून आली. संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याच्याकडे वाहनाची कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत आणि त्याने दिलेल्या उत्तरात मोठा संशय दिसून आला.

ताब्यातील ही १५० सीसी क्षमतेची दुचाकी (गाडी क्र. MH 08 U 9463) चोरीची किंवा फसवणूक करून आणलेली असावी असा पोलिसांचा दाट संशय आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर यांच्या फिर्यादीवरून अमोल जगतापविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही दुचाकी नेमकी कुठून आणि कशी आणली, याचा पुढील सखोल तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:30 09-10-2026

Happy journey marathi