Delhi CJP Protest: दिल्लीत ‘सीजेपी’च्या आंदोलनाला परवानगी नाकारली; राजधानीत ५७ मेट्रो स्थानके बंद आणि अनेक रेल्वे गाड्या रद्द

सुरक्षा व्यवस्थेसाठी २६ हजारांहून अधिक जवान तैनात; “परवानगीची काय गरज?” म्हणत अभिजित दिपके आंदोलनावर ठाम

Delhi CJP Protest च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी नाकारली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंदोलनाचा अर्ज १० दिवस आधी सादर करणे आवश्यक होते, जे पाळले गेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील ५७ प्रमुख मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुंबईहून सुटणारी ‘राजधानी एक्सप्रेस (२२२२१)’ रद्द करण्यात आली आहे.

आंदोलनाला अटकाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये बिहारमधून येणाऱ्या मगध एक्सप्रेस, तेजस राजधानी, संपूर्ण क्रांती; उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या प्रयागराज, शिवगंगा, शताब्दी, यूपी संपर्क क्रांती; मध्य प्रदेशातील महाकौशल एक्सप्रेस तसेच राजस्थान व हरियाणाला जोडणाऱ्या ७ प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीत तब्बल २६ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी आणि १५ हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. २०२० च्या दिल्ली दंगलींनंतरची ही सर्वात मोठी सुरक्षा तैनाती मानली जात आहे.

प्रसासनाच्या या कारवाईवर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आणि सह-संयोजक सौरभ दास यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जंतर मंतर हे आंदोलनासाठीच निश्चित केलेले ठिकाण आहे. संविधानाचे कलम १९ आपल्याला आंदोलनाचा मूलभूत हक्क देते, मग परवानगी घेण्याची काय गरज आहे? आमचे आंदोलन नक्कीच होईल,” असा ठाम निर्धार अभिजित दीपके यांनी व्यक्त केला आहे.

तसेच सौरभ दास म्हणाले की, “१३ कोटी मतदारांची नावे वगळण्यापूर्वी निवडणूक आयोगाने कोणाची परवानगी घेतली होती का? सरकारने दिल्लीत स्वतःच बंदची परिस्थिती निर्माण केली आहे. सरकार घाबरले असून ज्ञानेश कुमार यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. आम्ही देश वाचवण्यासाठी आंदोलन करणारच.”

Physciobot

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 09-10-2026