जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार ९ नोव्हेंबर रोजी जाहीर केली सुट्टी; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
*रत्नागिरी : *Ratnagiri Diwali Holiday 2026 च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीपावली काही दिवसांवर आली असून खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे, तर शाळांनाही एक तारीखपासून सुट्टी लागू होणार आहे. प्रशासनानेही दीपावलीला जोडून सुट्ट्या घेण्याची परंपरा कायम ठेवली असून, यंदाच्या दिवाळीत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केल्यामुळे हा सलग सुट्ट्यांचा योग जुळून आला आहे.
यंदा ५ नोव्हेंबरपासून वसुबारसेनेस सुरुवात होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. पूर्वघोषित वेळापत्रकानुसार ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयीन स्थानिक सुट्टी जाहीर करत असते. मात्र, यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी धनत्रयोदशीच्या ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ९ नोव्हेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे. त्यानंतर शनिवार व रविवारची प्रशासकीय साप्ताहिक सुट्टी आहे, तर बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्यानिमित्त १० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर आहे. तसेच ११ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने आधीच दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.
या सर्व नियोजनामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केल्याने शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सलग ५ दिवस सुट्टी मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी तर १२ व १३ नोव्हेंबरच्या सुट्टीचेही नियोजन करत पुढील आठवडा दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.














