Diesel Price Hike Meeting : मासेमारीसाठी डिझेल दरवाढ; तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेत मच्छीमार प्रतिनिधींची २८ ऑक्टोबरला विशेष बैठक

Diesel Price Hike Meeting : मासेमारीसाठी डिझेल दरवाढ; तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेत मच्छीमार प्रतिनिधींची २८ ऑक्टोबरला विशेष बैठक

कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांचा पुढाकार; जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Diesel Price Hike Meeting : मासेमारी व्यवसायासाठी लागणाऱ्या डिझेलच्या वाढत्या दरां संदर्भात सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक जिल्हा परिषदेतील कृषी सभापतींच्या दालनात पार पडणार आहे.

मच्छीमारा समोरील अडचणींवर होणार विचारमंथन
सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीच्या समस्येमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना आणि स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना अनेक आर्थिक व व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर गुहागर येथील शिवसेना जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती महेश नाटेकर यांनी ही पुढाकार घेऊन बैठक बोलावली आहे.

डिझेल दरवाढीमुळे पारंपरिक व आधुनिक मासेमारी व्यवसायावर होत असलेला विपरीत परिणाम, या संदर्भात राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या सवलती आणि शासनाकडे करावयाची उपाययोजना यावर बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच, मच्छीमार संघटना म्हणून या प्रश्नावर कशा पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे, याबाबतची दिशा निश्चित केली जाणार आहे.

Infigo eyecare

सर्व मच्छीमार संस्थांच्या अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थांच्या अध्यक्षांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी या महत्त्वपूर्ण आणि विशेष बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी केले आहे.