Raj Thackeray Karjat Torrent Power Meeting: ‘सह्याद्री जागा हो!’ टोरेंट प्रकल्पाविरोधात राज ठाकरेंचा कर्जतमध्ये एल्गार; सभेपूर्वी साय डोंगरात वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी

Raj Thackeray Karjat Torrent Power Meeting: 'सह्याद्री जागा हो!' टोरेंट प्रकल्पाविरोधात राज ठाकरेंचा कर्जतमध्ये एल्गार; सभेपूर्वी साय डोंगरात वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी

३३ हजार झाडांच्या कत्तलीवरून संताप; चिरंजीव अमित ठाकरेंसोबत साय डोंगराच्या पाऊलवाटेने स्थानिकांच्या भेटीला

कर्जत : Raj Thackeray Karjat Torrent Power Meeting संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कर्जत येथे भव्य आणि वादळी जाहीर सभा पार पडत आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे यांनी स्वतः कर्जतमधील साय डोंगरावर (Sai Hills) जाऊन तेथील ३३ हजार झाडांच्या कत्तलीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

कर्जत परिसरात उभारण्यात येत असलेल्या टोरेंट पॉवर (Torrent Power Project) प्रकल्पाच्या विरोधात राज ठाकरे यांनी याआधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका मांडली होती. आता ते थेट मैदानात उतरले असून आजच्या जाहीर सभेतून या विनाशकारी प्रकल्पाविरोधात आणि वृक्षतोडीविरोधात मनसेचा एल्गार पाहायला मिळणार आहे.

३३ हजार झाडांची कत्तल आणि साय डोंगरातील पाहणी
प्रकल्पाच्या नावाखाली साय डोंगराच्या अथांग पसरलेल्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. सुमारे ३३ हजार झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह स्थानिक जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत राज ठाकरे यांनी आज सकाळी साय डोंगरातील खडतर पाऊलवाटांवरून मार्गक्रमण करत तोडण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Radhakrushna patapedhi

या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील उपस्थित होते. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत होत असलेल्या या बेसुमार वृक्षतोडीवर आणि निसर्गाच्या हानीवर राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

‘सह्याद्री जागा हो’ ब्रीदवाक्यासह जाहीर सभा
‘सह्याद्री जागा हो’ या मुख्य आणि धगधगत्या ब्रीदवाक्याखाली मनसेतर्फे आजच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाला आणि वृक्षतोडीला स्थानिक नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचाही विरोध वाढू लागला आहे. आजच्या सभेतून राज ठाकरे टोरेंट प्रकल्पाविरुद्ध आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय ठाम भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.