Khed Shivaji Nagar Crime News: खेड येथील शिवाजीनगर परिसरात आढळला अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Khed Shivaji Nagar Crime News: खेड येथील शिवाजीनगर परिसरात आढळला अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

; खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

*खेड (रत्नागिरी): *Khed Shivaji Nagar Crime News समोर आली असून खेड शहरातील गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील टेलिफोन एक्सचेंजसमोर एका अंदाजे ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपूर्वीच्या कालावधीत संबंधित अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवाजीनगर येथील टेलिफोन एक्सचेंजसमोरील मोकळ्या परिसरात ही घटना घडली. या परिसरात राहणारे स्थानिक नागरिक रुपेश काशीराम पवार हे घरात असताना त्यांना अचानक परिसरातून उग्र दर्प (कुजलेला वास) येऊ लागला. वास कशाचा येत आहे हे पाहण्यासाठी त्यांनी घराबाहेर येत नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला.

शोध घेताना रुपेश पवार यांच्या शेजारीच एका मोकळ्या जागेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह अत्यंत सडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ खेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला असून, २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३२ वाजता खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Anant hights

सदर अनोळखी पुरुष कोण होता, तो या परिसरात कसा आला आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सध्या खेड पोलीस घेत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली असून परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.