Sunil Tatkare Vs Ramdas Kadam Dispute: रामदास कदमांचे सर्व आरोप खोटे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार; खासदार सुनील तटकरेंचा पलटवार

Sunil Tatkare Vs Ramdas Kadam Dispute: रामदास कदमांचे सर्व आरोप खोटे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार; खासदार सुनील तटकरेंचा पलटवार

रामदास कदमांनी ठाण्याऐवजी आग्र्याला जाऊन उपचार करावेत, तटकरेंचा घणाघाती टोला

Sunil Tatkare Vs Ramdas Kadam Dispute बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले होते. अजित पवार यांच्या घातपातप्रकरणी तटकरेंची चौकशी करण्याची मागणी करतानाच, तटकरे हे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पीए होते आणि त्यांनीच अंतुलेंना संपवले, अशा शब्दांत कदमांनी जोरदार निशाणा साधला होता. यावरून उठलेल्या वादळावर खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पहिली प्रतिक्रिया देत रामदास कदमांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

रामदास कदमांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि पायाहीन असल्याचे सांगत तटकरेंनी त्यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. "रामदास कदमांची मानसिक स्थिती सध्या ठीक नाही, त्यामुळे त्यांना उपचारासाठी ठाण्याऐवजी तातडीने आग्र्याला पाठवायला हवे," असा टोला तटकरेंनी लगावला. तसेच आपण कधीही अंतुले साहेबांचे पीए नव्हतो असे स्पष्ट करत, अंतुलेंबाबत कदमांनी केलेल्या विधानांवरून त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे आणि ढासळलेल्या प्रकृतीचे दर्शन घडते, अशी टीकाही त्यांनी केली. याप्रकरणी रामदास कदमांना लवकरच कडक कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा तटकरेंनी दिला आहे.

Sunil Tatkare Vs Ramdas Kadam Dispute: "विरोधी पक्षनेतेपदासाठी रामदास कदम माझ्या हातापाया पडले होते"
खासदार सुनील तटकरे यांनी रामदास कदमांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत अत्यंत गंभीर खुलासा केला:

Horizon techno.

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा रामदास कदम स्वतः आपल्याकडे आले होते आणि विनवणी करत हातापाया पडले होते.

त्या वेळी मी कदमांना स्वतःच्या गाडीत बसवून अजितदादांकडे घेऊन गेलो होतो, ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते.

"मी जे सांगतोय ते खरे की खोटे, हे रामदास कदमांनी ते ज्या जागृत देवस्थानाला मानतात, तिथे येऊन सांगावे," असे थेट आव्हान तटकरेंनी दिले.

*अनिल परबांच्या आरोपांचा आधी खुलासा करावा
*तटकरे पुढे म्हणाले की, माझ्यावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांवर जे गंभीर आरोप केले आहेत, त्याचा खुलासा त्यांनी आधी करावा आणि स्वतःची खरी प्रतिमा काय आहे हे जनतेला दाखवून द्यावे. महायुतीमध्ये नेत्यांमधील या जाहीर आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.