Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

देशात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.३७ लाखांवर; तज्ज्ञांच्या मते २०२७ अखेरपर्यंत सोने ६,२०० डॉलर प्रति औंसवर जाण्याचा अंदाज

नवी दिल्ली / मुंबई: जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशात सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू असून, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सोन्याचे दर पुन्हा खाली आले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १,३७,४९० रुपये झाला आहे, तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७,३४० रुपये नोंदवला गेला आहे. देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, याआधी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल २,५00 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली होती. बाजारातील मागणी कमी असणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरणे, ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव कायम असून, सध्या स्पॉट गोल्डचा भाव ३,८७९.७१ डॉलर प्रति औंस इतका आहे. डॉलरच्या किमतीत होणारे चढ-उतार आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्या-चांदीच्या भविष्यातील किमतींबाबत तज्ज्ञांचा अंदाज
इन्डिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सोन्याच्या भविष्यातील किमतींबाबत एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, २०२७ च्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव ६,२०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, तर चांदीचा भाव १८० डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे.

Shree clinic

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):
दिल्ली: २४ कॅरेट सोने १,३७,४९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्यासाठी १,२६,०४० रुपये.

मुंबई आणि कोलकाता: २४ कॅरेट सोने १,३७,३४0 रुपये, तर २२ कॅरेट सोने १,२५,८९0 रुपये.

चेन्नई: २४ कॅरेट सोने १,३८,४८0 रुपये, तर २२ कॅरेट सोने १,२६,९४0 रुपये.

पुणे आणि बंगळुरू: २४ कॅरेट सोने १,३७,३४0 रुपये, तर २२ कॅरेट सोने १,२५,८९0 रुपये.

चांदीच्या दरातही मोठी घसरण
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव १,९४,९00 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी दिल्लीतील सराफा बाजारात एका दिवसात चांदीच्या दरात प्रति किलोमागे ३,५00 रुपयांची घसरण झाली होती. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने देशांतर्गत बाजारात ४ लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता; परंतु त्यानंतर चांदीच्या दरात सातत्याने मोठे चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट सिल्व्हरचा भाव ४९.०५ डॉलर प्रति औंस एवढा आहे. त्यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरातील घडामोडींकडे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य ग्राहkaंचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाची टीप: सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या संबंधित शहरातील ताजे दर नक्की तपासून घ्यावेत. तसेच दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता, घडणावळ (मॅकिंग चार्जेस) आणि लागू कर यांचा विचार करणे फायदेशीर ठरते.