लोटे औद्योगिक वसाहतीत ९० हजारांची कंडक्टर वायर चोरीला! कंपनीच्या गोडावूनसमोरून ३,८०० मीटर वायरवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

लोटे औद्योगिक वसाहतीत ९० हजारांची कंडक्टर वायर चोरीला! कंपनीच्या गोडावूनसमोरून ३,८०० मीटर वायरवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

लवेल (ता. खेड) येथील लीन पॉवरटेक इंजिनिअर्स कंपनीच्या आवारातील घटना; खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

*खेड (रत्नागिरी) : *खेड तालुक्यातील लोटे (लवेल) येथील एका खाजगी कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या आवारात ठेवलेली तब्बल ९० हजार रुपये किमतीची कंडक्टर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

लाकडी ड्रममधील ३,८०० मीटर वायर लंपास :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोटे (लवेल), ता. खेड येथील ‘लीन पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Leena Powertech Engineers Private Limited) कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या जागेत लाकडी ड्रममध्ये कंडक्टर वायर ठेवण्यात आली होती. दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने ही वायर चोरून नेली. चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ९०,००० रुपये किमतीची एकूण ३,८०० मीटर (२ वर्षे जुनी वापरती) पिळ मारलेली कंडक्टर वायर (AAAC २३२ mm2 डायमीटर) यांचा समावेश आहे.

Nadi pariksha

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद :

या चोरीप्रकरणी कंपनीचे कर्मचारी अखिलेशकुमार श्रीलालताप्रसाद प्रजापती (वय ४८ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. हनुमानपेठ, चिखले अपार्टमेंट, गांधीचौक, ता. खेड; सध्या रा. विरार ईस्ट, जि. पालघर) यांनी गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३३ वाजता खेड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.