दौऱ्यात देवदर्शनाला विशेष प्राधान्य; गोवळकोटच्या करंजेश्वरीनंतर गुहागरमधील दुर्गादेवी व वाडेश्वर मंदिरास भेट देणार
Chandrakant Patil Konkan दौऱ्यानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या खासगी दौऱ्यादरम्यान आज सकाळी त्यांनी चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील प्रसिद्ध श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे सपत्नीक दर्शन घेतले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काल रात्री चिपळूणमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या या संपूर्ण कोकण दौऱ्यात देवदर्शनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात त्यांनी गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात जाऊन पूजा व दर्शन घेतले.
Chandrakant Patil Konkan दौऱ्यात गुहागरमधील मंदिरांनाही भेट
चिपळूणमधील श्रीदेवी करंजेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री पाटील यांचा पुढील प्रवास गुहागर तालुक्याकडे असणार आहे. गुहागर येथील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिर आणि श्री देव वाडेश्वर मंदिरातही ते जाऊन दर्शन घेणार आहेत.

हा पूर्णपणे खासगी दौरा असला तरी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या या कोकण भेटीमुळे आणि देवदर्शनाच्या कार्यक्रमांमुळे स्थानिक पातळीवर व परिसरात त्यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.













