Voter List Revision: महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; २२ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार

Voter List Revision: महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; २२ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार

१८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन; व्हॉट्सॲपद्वारेही मतदारांना प्रपत्र मिळण्याची सोय

Voter List Revision अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात भारत निवडणूक आयोगाने सुधारणा केली असून, महाराष्ट्रासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन केले जाणार असून, दावे आणि हरकतींचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने १८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक अधिकृतरीत्या प्रसिद्ध केले आहे.

Voter List Revision चे टप्पे आणि महत्त्वाच्या तारखा
सुधारित कार्यक्रमानुसार, गणना प्रपत्रे तयार करणे आणि त्यांची छपाई करण्याची कार्यवाही १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. आता १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रत्यक्ष गणना प्रपत्रांचे वितरण आणि संकलन केले जाणार आहे. संकलित होऊन प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांवरील (EFs) आवश्यक कार्यवाही १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Hotel star caters

मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात नोटीस बजावणे तसेच दावे आणि हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदारांसाठी व्हॉट्सॲपद्वारे प्रपत्रांची सुविधा आणि प्रशासनाला निर्देश
दरम्यान, मतदारांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे. ज्या मतदारांच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सॲपची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना भरलेले गणना प्रपत्र व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच ज्या मतदारांकडे ही सुविधा उपलब्ध नाही, त्यांना स्वतंत्र अर्जाद्वारे गणना प्रपत्र दिले जाणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, तसेच या कार्यक्रमाची राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी आणि अद्ययावतीकरण करण्याच्या दृष्टीने SIR प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, मतदारांनी निर्धारित वेळेत गणना प्रपत्रासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.