Malgund Rani Lakshmibai Jayanti: मालगुंड येथील शाळेत राणी लक्ष्मीबाई जयंतीचा जागर; डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Malgund Rani Lakshmibai Jayanti: मालगुंड येथील शाळेत राणी लक्ष्मीबाई जयंतीचा जागर; डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे विद्यार्थ्यांना पुस्तके व शाळेला ग्रंथभेट; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार

Malgund Rani Lakshmibai Jayanti संदर्भात रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक एकमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचा उत्साहपूर्ण जागर करण्यात आला. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे १९ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ज्या शाळेत कवी केशवसुतांचे वडील दामले गुरुजी मुख्याध्यापक होते, त्याच शाळेत हा सोहळा पार पडला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक, लेखक व नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या इंग्रजांशी झालेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजेल अशा भाषेत सांगितली. राणीचे चरित्र विद्यार्थ्यांनी वाचून त्यापासून प्रेरणा घ्यावी, तसेच आई-वडिलांनाही ही पुस्तके वाचण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले.

Malgund Rani Lakshmibai Jayanti उपक्रमाची दहा वर्षांची परंपरा आणि ग्रंथभेट
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी संघाच्या लवकरच सुरू होणाऱ्या शताब्दी वर्षानिमित्त माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास आणि कार्य पोहोचावे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून संघातर्फे शाळांमध्ये जयंती कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि शाळांकडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Law firm

या कार्यक्रमात संघातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राणी लक्ष्मीबाईंचे छोटेखानी चरित्र आणि गोष्टींची पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच शाळेला राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा आणि सुमारे तीन हजार रुपयांची उपयुक्त पुस्तके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती आणि पारितोषिक वितरण
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. इंदुमती सुरेश नाईक यांनी कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. समारंभाला कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्या सौ. सुयोगा जठार, प्रमोद कोनकर, सचिव सौ. शिल्पा पळसुले-देसाई, मालगुंड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट, उपाध्यक्ष सौ. भक्ती मयेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संतोष केळकर आणि ग्रामपंचायत सदस्य शुभदा मुळ्ये यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाई जयंतीचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सौ. मयेकर यांनी सांगितले, तर मानस देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील गुणानुक्रमे विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला:

चित्रकला स्पर्धा

इयत्ता पहिली: स्मिरा सागर मांडवकर, खुशी हेमंत खापणे, गार्गी महेश फडकले

इयत्ता दुसरी: चैतन्या गिरीश भाटकर, श्रीवेद सागर लिंगायत, अंश दशरथ कळंबटे

इयत्ता तिसरी: माऊली मंदार पात्ये, मनवा योगेश वेदरे, संस्कृती महेश फडकले

इयत्ता चौथी: रिशी जितेंद्र कातळकर, अनुश्री मयूर पाटील, आध्या तुषार दुर्गवळी

हस्ताक्षर स्पर्धा

इयत्ता पहिली: अनुश्री सुनील मोडक, श्रीशा निखिल मांडवकर, गार्गी महेश फडकले

इयत्ता दुसरी: राजवीर अजिंक्य जाधव, अन्वी अनिल हुमणे, विहान विजय मांडवकर, प्रणव प्रसाद मुकादम

इयत्ता तिसरी: आदिती सचिन चव्हाण, युगा दिनेश भरणकर, विहान दिलीप भातडे

इयत्ता चौथी: हर्ष आनंद जोशी, ईश्वरी सौरभ केळकर, ईशिता सौरभ केळकर

पाढे पाठांतर स्पर्धा

इयत्ता पहिली: अनुश्री सुनील मोडक, विवान चैतन्य सुर्वे, कार्तिक भूषण मयेकर

इयत्ता दुसरी: श्रीवेद सागर लिंगायत, अन्वी अनिल हुमणे, राजवीर अजिंक्य जाधव

इयत्ता तिसरी: आदिती सचिन चव्हाण, निखिल नीलेश लिंगायत, माऊली मंदार पात्ये, अद्वैत गिरीश बापट

इयत्ता चौथी: नील सुहास भातडे, हर्ष आनंद जोशी, वेदांत संदेश मांडवकर, ईश्वरी सौरभ केळकर

वक्तृत्व स्पर्धा

इयत्ता पहिली: अनुश्री सुनील मोडक

इयत्ता दुसरी: राजवीर अजिंक्य जाधव, श्रीवेद सागर लिंगायत

इयत्ता तिसरी: माऊली मंदार पात्ये, निखिल नीलेश लिंगायत, विहान दिलीप भातडे, युगा दिनेश भरणकर

इयत्ता चौथी: हर्ष आनंद जोशी, नील सुहास भातडे, वेदांत संदेश मांडवकर