पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद; गुहागर तालुक्यात सर्वात कमी सहभाग
Ratnagiri Crop Insurance संदर्भात हवामानाच्या लहरीपणामुळे पिकांच्या नुकसानीच्या धास्तीत असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद दिला आहे. पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०२६-२७ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १९,०३९ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला असून, ९,८६७.०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. यामध्ये कर्जदार शेतकरी १४,०३९ तर बिगर कर्जदार शेतकरी ५०० आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक विमा संगमेश्वर तालुक्यात काढण्यात आला आहे. तेथील ४,१०७ शेतकऱ्यांनी १,७७२.७२ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ मंडणगडमध्ये ३,३१२ शेतकरी (१,५६१.६९ हेक्टर) आणि राजापूरमध्ये २,६५६ शेतकरी (१,७४३.८० हेक्टर) यांनी विमा काढला आहे.
Ratnagiri Crop Insurance साठी तालुकावार सहभाग
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला गेला असून, गुहागर तालुक्यात सर्वात कमी सहभाग दिसून आला आहे:

संगमेश्वर: ४,१०७ शेतकरी (१,७७२.७२ हेक्टर)
मंडणगड: ३,३१२ शेतकरी (१,५६१.६९ हेक्टर)
राजापूर: २,६५६ शेतकरी (१,७४३.८० हेक्टर)
खेड: २,२१४ शेतकरी
चिपळूण: २,०३२ शेतकरी
लांजा: १,४९१ शेतकरी
दापोली: १,२६५ शेतकरी
रत्नागिरी: १,२०६ शेतकरी
गुहागर: ७५६ शेतकरी (४१३ हेक्टर)
फार्मर आयडी, ई-पीक पाहणी आणि जिओ टॅगिंग बंधनकारक
पाऊस, गारपीट, वादळ आणि हवामानातील अचानक बदलांमुळे पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास वाढत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अजूनही विमा योजनेत सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीक विम्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग असलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य असून, अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













