MPSC Civil Judge Exam: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी होणार; आयोगाकडून तारीख जाहीर

MPSC Civil Judge Exam: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी होणार; आयोगाकडून तारीख जाहीर

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर केंद्रांवर पार पडणार; उमेदवारांना तारखेची नोंद घेण्याचे आवाहन

MPSC Civil Judge Exam अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही येत्या ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाने २० नोव्हेंबर रोजी यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली असून, संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिनांकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोगाने या परीक्षेसाठी जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ अन्वये ३० एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये पात्र उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

MPSC Civil Judge Exam ची राज्यातील परीक्षा केंद्रे
ही पूर्व परीक्षा राज्यातील चार प्रमुख जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे:

Arihant 3

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नवी मुंबई

नागपूर

विधी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि न्यायिक सेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारांना आपल्या अभ्यासाचे व प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.