Konkan Railway Block: दिवा-पनवेल मार्गावरील पॉवर ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल; सहा गाड्या मार्गात नियंत्रित, दोन गाड्या विलंबाने

Konkan Railway Block: दिवा-पनवेल मार्गावरील पॉवर ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल; सहा गाड्या मार्गात नियंत्रित, दोन गाड्या विलंबाने

२२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मंगळुरू, मडगाव, करमळी व एर्नाकुलम मार्गावरील प्रवाशांना फटका; सुधारित वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

Konkan Railway Block संदर्भात रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली असून, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या आठ दिवसांच्या कालावधीत कोकण मार्गावरील सहा गाड्या मार्गात विविध स्थानकांवर नियंत्रित करण्यात येणार असून, दोन गाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या या पॉवर ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरून मुंबई, पुणे आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास काहीसा लांबणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांच्या मार्गातील नियंत्रण आणि विलंबाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

Konkan Railway Block: मार्गात नियंत्रित केल्या जाणाऱ्या सहा गाड्या
मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४): ही गाडी २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आपटा स्थानकात ५० मिनिटे थांबवून ठेवली जाईल.

Shanti2

मडगाव-मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस (२०११२): ही गाडी २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान सोमटणे स्थानकात १० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे.

तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११४): ही गाडी २३ नोव्हेंबरला आपटा स्थानकात १०९ मिनिटे नियंत्रित राहील.

एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस (२२१४९): ही गाडी २४ आणि २७ नोव्हेंबरला आपटा येथे १०९ मिनिटे थांबवली जाईल.

तिरुअनंतपुरम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५३): ही गाडी २८ नोव्हेंबरला आपटा येथे १०९ मिनिटे नियंत्रित राहणार आहे.

एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५५): ही गाडी २५ नोव्हेंबरला ६० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे.

दोन गाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटणार
मार्गात नियंत्रित होणाऱ्या गाड्यांसोबतच मुंबईतून कोकणाकडे येणाऱ्या दोन गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस (११०९९) ही २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११५) ही २६ नोव्हेंबरला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटणार आहे.

कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांच्या या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.