Kartiki Ekadashi Ratnagiri: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव उत्साहात

Kartiki Ekadashi Ratnagiri: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव उत्साहात

बापू गवाणकर दांपत्याला प्रथम पूजेचा मान

Kartiki Ekadashi Ratnagiri शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव २१ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या पावन पर्वानिमित्त होणाऱ्या प्रथम पूजेचा मान प्रसाद ऊर्फ बापू गवाणकर आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रिया गवाणकर यांना मिळाला. रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात एकादशीच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भाविकांची मोठी श्रद्धा आणि भक्तिभाव पाहायला मिळतो. दर्शन रांगेत उभे राहून भाविकांनी श्रद्धापूर्वक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले व पूजा-अर्चा केली.

Shitit jyotish