Dapoli Tourism Winter: दापोलीत पारा १०.१ अंशांवर; गुलाबी थंडी आणि समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने पर्यटकांची पावले दापोलीकडे

Dapoli Tourism Winter: दापोलीत पारा १०.१ अंशांवर; गुलाबी थंडी आणि समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने पर्यटकांची पावले दापोलीकडे

हर्णै, मुरुड, कर्दे व लाडघर किनाऱ्यांवर वाढली वर्दळ; स्थानिक पर्यटनपूरक व्यवसायांना सुगीचे दिवस

Dapoli Tourism Winter हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चांगलाच बहर आला असून, निळाशार समुद्र आणि डोंगररांगांमधील गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक दाखल होत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर वाढल्याने रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी तालुक्याचे किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. समुद्राच्या लाटांचा नाद आणि गारवा यांचा संगम अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले दापोलीकडे वळत असल्याने स्थानिक पर्यटन व्यवसायाला गती मिळाली आहे.

पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा वाढला असून, दिवसभरातील आल्हाददायक हवामान पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. दापोली तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू आणि नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

Dapoli Tourism Winter: समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ आणि व्यवसायांना चालना
वाढत्या थंडीसोबतच दापोली तालुक्यातील हर्णै, मुरुड, कर्दे, लाडघर आणि कोळथरे या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. किनाऱ्यावर फेरफटका मारणे, लाटांचा आनंद घेणे, तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्ये अनुभवणे याला पर्यटकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

Radhakrushna patapedhi

पर्यटकांच्या या वाढत्या ओघामुळे तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, खानावळी आणि इतर स्थानिक पर्यटनपूरक व्यवसायांना आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.