रुग्णवाहिकेतून नेताना वाटेतच थांबली हालचाल; चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
चिपळूण: Chiplun Newborn Death प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, विनोद महादेव पाटेकर यांच्या सून दिव्यांका दुर्वास पाटेकर (वय ३२) यांना नवजात बालक झाले होते. या बालकाला अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने १०८ रुग्णवाहिकेतून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच या बालकाची हालचाल थांबली.
उपजिल्हा रुग्णालयात तपासणी आणि पोलीस नोंद वाटेत हालचाल थांबल्यानंतर बालकाला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालकाची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.














