Ratnagiri News: रत्नागिरीत डेंग्यू नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा निर्णय; ग्रामीण ओपीडी वाढवण्यावरही भर

Ratnagiri News: रत्नागिरीत डेंग्यू नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा निर्णय; ग्रामीण ओपीडी वाढवण्यावरही भर

Dengue Control Measures अंतर्गत तळी, बांधकाम टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडणार; जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत विलास चाळके यांची माहिती

रत्नागिरी: Dengue Control Measures च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील तलाव आणि शहरी भागात इमारतींची बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदतही जनजागृतीसाठी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांनी दिली.

डासांच्या अळ्यांवर नियंत्रणासाठी पावले रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ सुरू असून, रुग्णांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य समितीच्या बैठकीत नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डेंग्यू डासांच्या अळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील पाण्याची तळी, छोटे पाणवठे तसेच अळ्यांची शक्यता असलेल्या पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यावर बैठकीत एकमत झाले. दुसरीकडे, शहरी भागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमध्ये खोदाई केलेल्या ठिकाणी पाणी साचलेल्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरी भागात नगर परिषद आणि नगर पालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच, हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने डेंग्यूबाबत जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एचपीव्ही लसीकरणासाठी पालक जागृतीवर भर आरोग्य विभागामार्फत शालेय पातळीवर मुलींना एचपीव्ही (HPV) लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, पालकवर्गामध्ये याबाबत पुरेशी जागृती नसल्याने या कार्यक्रमाला जिल्ह्यात खीळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांमध्ये जागृती करण्यासाठी शिक्षक वर्गाने प्रयत्न करावेत, यावर बैठकीत चर्चा झाली आणि शिक्षकांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यावर अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले.

Shitit jyotish

ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावरही बैठकीत विचारमंथन झाले. ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ओपीडी (OPD) वाढण्यास मदत होईल, यावर समितीमध्ये चर्चा करण्यात आली.