ब्रेकिंग न्यूज : मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आक्रमक रास्तारोको आंदोलन; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा!

ब्रेकिंग न्यूज : मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आक्रमक रास्तारोको आंदोलन; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा!

आंजणारी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक; अपघात रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

लांजा (रत्नागिरी) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांविरोधात आज बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. शिवसैनिकांनी महामार्ग रोखून धरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी :
मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी परिसरात गेल्या काही काळापासून अपघातांची मालिका सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. या परिसरातील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी; शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी :
आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी आंजणारी येथे रस्त्यावर उतरून महामार्ग रोखून धरला आहे. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Unity aster