Rajapur News: राजापुरात मुख्य मार्गावर अनधिकृतपणे मासे विक्री करणाऱ्या १३ महिलांविरोधात गुन्हा दाखल

Rajapur News: राजापुरात मुख्य मार्गावर अनधिकृतपणे मासे विक्री करणाऱ्या १३ महिलांविरोधात गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी घाण व दुर्गंधी पसरवल्याचा आरोप; नगरपालिकेच्या स्वच्छता पथकाची कारवाई

रत्नागिरी : Rajapur Fish Sale (राजापूर मासे विक्री) प्रकरणी राजापूरमधील शिवाजी पथ ते बाजारपेठ या मुख्य मार्गावर अनधिकृतपणे मासे विक्री करून सार्वजनिक ठिकाणी घाण आणि दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी १३ महिलांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता पथकाने ही धडक कारवाई केली असून, २६ नोव्हेंबर रोजी ही घटना समोर आली.

पालिकेचे स्वच्छता मुकादम राजन जाधव, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या सुप्रिया पोतदार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार आणि सफाई कर्मचारी संदेश जाधव यांचे पथक शिवाजी पथावरील महालक्ष्मी हॉटेलसमोर गस्तीवर होते. या वेळी संबंधित महिला रस्त्यावर मासे विक्री करत असल्याचे, तसेच माशांची खवले आणि घाण पाणी थेट रस्त्यावर टाकून परिसरात दुर्गंधी पसरवत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

Rajapur Fish Sale प्रकरणातील कायदेशीर कारवाई व आरोपींचा तपशील
सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. धोपेश्वर, पन्हळे) यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २६७ व २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Radhakrushna pat6

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

नाटे येथील रहिवासी: नूरजहाँन सोलकर, नाजिया वाडकर, निहा सोलकर, समैया बोरकर, रजिया पटेल, सादिका फणसोपकर, निलोफर होडेकर, हनिफा मौला आणि चिरादुन पावसकर.

नाणार इंगळवाडी येथील रहिवासी: नसरिन सोलकर आणि अक्सा समीर सोलकर.

राजापूर व कोढतड येथील रहिवासी: रहमा सोलकर (रा. मधीलवाडा, राजापूर) आणि शबाना काझी (रा. कोढतड).