Ratnagiri News: रत्नागिरीत नळांवर उपकरणे बसवून पाणी बचतीचा उपक्रम; नगर परिषद व रोटरी क्लबचा पुढाकार

Ratnagiri News: रत्नागिरीत नळांवर उपकरणे बसवून पाणी बचतीचा उपक्रम; नगर परिषद व रोटरी क्लबचा पुढाकार

Water conservation drive अंतर्गत ५० ते ६० टक्के पाणी बचतीचा दावा; आठवड्यात दोन दिवस पाणी कपातीचेही संकेत

Water conservation drive रत्नागिरी शहरात राबवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी संयुक्त उपक्रम हाती घेतला असून, धरणांतील घटता पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घरे तसेच शासकीय कार्यालयांतील सिंक आणि बेसिनच्या नळांवर पाणी बचतीची उपकरणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमातून ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होईल, असा दावा रोटरी क्लबने केला असून, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कमी पर्जन्यमान, कडक उन्हाळा आणि पाणीपुरवठा नियोजन
यंदा कमी पर्जन्यमान आणि कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवण्यासाठी नगरपालिकेकडून नियोजन केले जात असून, गेल्या दोन महिन्यांपासून दर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

उपकरणांचे वाटप आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सांगितले की, या उपकरणांमुळे नळातून वाहणाऱ्या पाण्याचा अनावश्यक वापर कमी होऊन ५० ते ६० टक्के पाणी बचत होऊ शकते. पहिल्या टप्प्यात रोटरी क्लबने खरेदी केलेली उपकरणे शासकीय कार्यालयांना वितरित केली जाणार आहेत. त्यानंतर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन उपकरणे खरेदी करत नागरिकांच्या घरांतील नळांना बसवण्यासाठी वाटप केले जाईल, असे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, गटनेते बाळू साळवी, सभापती सुहेल साखरकर, नगरसेविका सायली पाटील आणि मानसी करमरकर उपस्थित होते.

Amey jwelrs

आठवड्यात दोन दिवस पाणी कपातीचे संकेत
पाणी बचतीसाठी आठवड्यातील आणखी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी सांगितले. सध्या दर सोमवारी पाणी कपात केली जात असून, ही कपात पुरेशी नसल्याचे पाटबंधारे विभागाने कळवले आहे. पाटबंधारे विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.