Devrukh News: लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची फसवणूक; रत्नागिरीतील तरुणाला अटक

Devrukh News: लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची फसवणूक; रत्नागिरीतील तरुणाला अटक

तरुणाविरोधात गुन्हा दाखल; न्यायालयाकडून २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Devrukh Police ठाण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वेदांत विजय पेडणेकर (वय २०, रा. खेडशी भंडारवाडी, ता. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत आणि पीडित विद्यार्थिनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते आणि त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. मार्च २०२५ ते मे २०२६ या कालावधीत वेदांत याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे विद्यार्थिनीने तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, वेदांत याचे अन्य एका युवतीशी प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले. त्या नव्याने प्रेमसंबंध जुळलेल्या युवतीने पीडित विद्यार्थिनीला फोन करून वेदांतसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगितले; या प्रकारानंतर फसवणुकीची ही बाब उघडकीस आली.

Amey jwelrs

Devrukh Police कारवाई आणि न्यायालयाचा निर्णय
गुन्हा दाखल झाल्यानंतर देवरुख पोलिसांनी वेदांत पेडणेकर याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.