*राजापूर तालुक्यातील कोंडये येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता! गुप्तपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा वडिलांचा संशय; राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

*राजापूर तालुक्यातील कोंडये येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता! गुप्तपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा वडिलांचा संशय; राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

पत्नीला बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेला तरुण ६ दिवसांनंतरही परतला नाही; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद

राजापूर (रत्नागिरी) :
राजापूर तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून या तरुणाचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले असल्याची तक्रार तरुणाच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

सकाळी पत्नीला सांगून घराबाहेर पडला, पण परतलाच नाही :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडये खालचीवाडी (ता. राजापूर) येथील रहिवासी निनाद किशोर शिवगण (वय २८ वर्षे) हा शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी तेजल शिवगण हिला "बाहेर जाऊन येतो" असे सांगून राहत्या घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र त्याचा कसून शोध घेतला, परंतु अद्यापपर्यंत त्याचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही.

राजापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल :
आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने गुप्तपणे आणि गैरकायदेशीरपणे परिरुद्ध (डांबून) ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करत वडील किशोर गणपत शिवगण (वय ५५ वर्षे, व्यवसाय- शेती, रा. कोंडये खालचीवाडी, ता. राजापूर) यांनी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३८ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून राजापूर पोलीस बेपत्ता तरुणाचा कसून शोध घेत आहेत.

Shanti real estate 1