Farmer ID: पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानित योजनांसाठी फार्मर आयडी तयार ठेवण्याचे रत्नागिरीत आवाहन

Farmer ID: पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानित योजनांसाठी फार्मर आयडी तयार ठेवण्याचे रत्नागिरीत आवाहन

Farmer ID व महाआयडी द्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर लाभार्थी निवड

Farmer ID आणि महाआयडी तयार ठेवण्याचे आवाहन रत्नागिरीच्या जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त यांनी जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी व पशुपालकांना केले आहे. शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध अनुदानित योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांची लाभार्थी निवड ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) या तत्त्वावर होणार असल्याने आवश्यक आयडी आणि कागदपत्रे आधीच तयार ठेवणे महत्त्वाचे ठरले आहे.

या योजनांतर्गत पशुपालकांना दुधाळ जनावरांचे गट वाटप (गाय/म्हैस), शेळी-मेंढी गट वाटप (१०+१ आणि २०+१ गट), कुक्कुटपालन (पोल्ट्री व्यवसाय), मुरघास निर्मिती व कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

या सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची आहे.

Arihant 2

Farmer ID सोबत अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क
ऑनलाइन अर्जासोबत लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:

आधार कार्ड

बँक पासबुक

रहिवासी दाखला

जातीचा दाखला

७/१२ व ८-अ उतारा

पासपोर्ट फोटो

रेशन कार्ड झेरॉक्स

व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र

योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पशुपालकांनी संबंधित पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.