Ratnagiri MSEDCL Office: रत्नागिरीतील चाफे महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; धक्काबुक्कीने खळबळ

Ratnagiri MSEDCL Office: रत्नागिरीतील चाफे महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; धक्काबुक्कीने खळबळ

MSEDCL च्या सहाय्यक अभियंता राजेंद्र पवार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; विद्युत कनेक्शनच्या वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती

MSEDCL च्या रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक अभियंत्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमुळे स्थानिक परिसरासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सहाय्यक अभियंता राजेंद्र पवार यांच्यावर या घटनेत हल्ल्याचा प्रयत्न झाला असून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार प्रसाद गजानन देसाई (रा. मांजरे) यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विद्युत कनेक्शन देण्यावरून राजेंद्र पवार आणि प्रसाद देसाई यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून हा हल्ल्याचा प्रयत्न आणि धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे.

Shanti 3

MSEDCL कर्मचाऱ्यांची नाराजी आणि जयगड पोलिसांची कारवाई
शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या अभियंत्यावर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण पसरले असून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत असून घटनेचे नेमके कारण आणि तपशील तपासातून स्पष्ट होणार आहेत.