कवी केशवसुत हे कोकणाचे साहित्य वैभव : राजन दांडेकर

खेड : कवी केशवसुत यांच्या कविता या आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत. कवी केशवसूत हे रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच कोकणचे अजरामर त्यात साहित्य वैभव असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन दांडेकर यांनी बोलताना केले.

कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेडच्यावतीने कवी केशवसुतांच्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात झाला. या वेळी उपस्थित सदस्यांनी कवी केशवसूत यांच्या कवितांचे वाचन केले. कोकण मराठी साहित्य परिषद खेडचे अध्यक्ष राजन दांडेकर, उपाध्यक्ष प्रा. संपदा काळे, कविता जंगम, प्रा. नाला अनघा तोडकरी, सदस्य शशिकांत यांना मेहता, इकबाल फकी, आबा निकम, तील किशोर धुत्रे, स्वप्नील वनारे, राकेश यांनी देवरूखकर यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 13/Nov/2024