रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत महिला बचत गटांना गावातच मिळणार रोजगार

रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आता सहायक संस्था म्हणून सक्षम ग्रामसंघाची निवड करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात १ हजार १२४ गावांमध्ये महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळणार आहे जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे.

या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमासामी विमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरु असलेल्या योजनांची गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमीत योजनानिहाय कामाची माहिती घेण्यात येत आहे, अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करत आहेत.

जलजीवन मिशन उपक्रमामध्ये गावांतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी नियोजन, आराखडा अंमलबजावणी, व्ययभाषन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामस्तरावर समुदायांना एकत्र करून त्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक गावात सहायक संस्था म्हणून सक्षम ग्राम संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येणार अहे. यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करण्यात येणार आहे या महिला बचतगटांना २ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. वा महिला बचत गटांन्ना ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे, अपेक्षित लोकवर्गणी गोळा करणे, योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाची व्यवस्था निर्माण करणे, समित्यांच्या बैठका आयोजन, ग्रामसभा आयोजन करणे, सांडपाणी व्यवस्थापन इ. विषयांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस साहाय्य करणे, नळ जोहणीसंबंधी कुटुंबांना प्रोत्साहित व प्रवृत्त करणे, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत जिल्हा कार्यालय यांच्यामध्ये दुवा म्हणून काम पाहणे, समाज संघटन व माहिती व संवाद उपक्रम राबवणे, केंद्र, राज्य व जिल्हा स्वरावरील विविध अभियानांमध्ये सक्रीय सहभागी होऊन अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे, पाण्यासंबंधी विविध बाबी जसे पाऊस पाणी संकलन, कृत्रिम पुनर्भरण, पाणी गुणवत्ता जलजन्य आजार, पाणी बचत, पाण्याची हाताळणी, पाणीपुरवठा योजन इ. संबंधी जाणीव जागृतीपर उपक्रम राबवणे आदी त्यांची कार्य असणार आहेत.

जिल्ह्यात १ हजार १२७ गावामध्ये नळ पाणी योजनांमध्ये या महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. जास्तीत जास्त महिला बचत गटांनी यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जि. प. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीत ३ नलजल मित्र
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्लंबर, मेकॅनिकल, फिटर व इलेक्ट्रिशन, पंप ऑपीटा यामाणे ३ नलजल मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना ठरावीक मानधनही दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 25/Sep/2024