भूमी कदमला तायक्वांदोमध्ये रौप्यपदक

लोटे : आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई साऊथ झोन २ तायक्वांदो झोनल टूर्नामेंट २०२४ मध्ये भूमी कदम या विद्यार्थिनीने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत ७२ शाळा सहभागी झाल्या होत्या. तिने उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सीबीएसई स्कूल भूमी कदम गेम्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पटर्वधन, मुख्याध्यापिका आरती खाडीलकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 25/Sep/2024