रत्नागिरी : सावंतवाडीतील तरूणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्ते घाटातील मृतदेहाचा उलघड झाला. सर्वांनाच अचिंबत करणारा हा प्रकार आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणांने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याने हा सर्व बनाव असल्याचे म्हणणे आहे. मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे संबंधित तरुणाची मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार आहे. प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र ४ पथके काम करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
योगेश पिंपळ आर्या (वय ३०रा. सावंतवाडी आजगांव) याला खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत आहे. १७ सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलिस ठाण्यात तशी खबर दिली असून पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्ये सुद्धा केली आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. स्वप्नात आलेल्या त्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आपण खेडमध्ये आलो. त्या दरम्यान त्यान इन्स्टाग्रामवरही काही व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये त्यांनी काही माहिती दिली. पोलिसांनी एकुणच त्याच्या प्रवासाबाबत आणि
स्वप्नाबाबत विचारणा केली असता. आपण खेडमध्ये त्या मृतदेहाच्या शोधासाठी आलो होती. परंतु मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुद्धीत आलो, तर मी सुरतमध्ये होतो. तेथे काही फोटो काढले. त्यानंतर पुन्हा प्रवासात मला जेव्हा जाग आली तेव्हा खेड रेल्वे स्थानकाच बोर्ड दिसला. त्यानतंर मी चार दिवस मृतदेहाच्या शोधत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या जबाबत वारंवार होणार बदल आणि वस्तूस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळुन आली. त्यामुळे हा सर्व प्रकार बोगस असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी धडपड सुरू असून खेड, गोवा, सिंधुदुर्गमधील बेपत्ता झालेल्यांची पोलिस माहिती घेत आहेत.
आर्या गोव्यात खासगी कंपनीत काम करत होता. मित्रांबरोबर तो गोव्यात राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गोव्यातही त्याची चौकशी केली. तेव्हा एकतर्फी प्रेमातून त्याच्यावर काहीसा मानसिक प्रभाव होता. त्यामुळे त्या मुलीला प्रभावीत करण्याच्यादृष्टीने त्याने काही प्रकारही केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तो सात दिवस गायब होता. तेव्हा त्या मुलीवर याचा काय परिणाम झाला असेल का, असे देखील तो मित्राला विचारत होता. त्यामुळे पोलिसांना आर्याचा मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्वप्नाचे आणि जंगलातील मृतदेहाचे गुढ कायम आहे.
आर्या याला पब्जी गेम खेळण्याची सवय आहे. इन्स्टाग्रामवर टास्क संदर्भात काही व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत. त्यामुळे हा टास्कचा एखादा प्रकार तरी नाही ना, याचा तपासही पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 25-09-2024