रत्नागिरी : युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या उद्या मुलाखती

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० वा. हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य रोजगार व नावीन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थांकडील अडीच हजार पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 26-09-2024