रत्नागिरी : आदर्श शाळा पुरस्काराचे आज वितरण

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कार वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज (ता. २६) होणार आहे.

माळनाका येथील मराठा भवन येथे सकाळी १०.३० वा. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एम. कासार यांनी दिली.