ऑस्ट्रेलियन पीएम अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इंडियाची भेट

भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अ‍ॅडलेडच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियातील खेळाडू दोन दिवसीय सराव सामन्यासाठी कॅनबेरा येथे पोहचले आहेत.

गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय संघातील खेळाडू यांची ग्रेट भेट झाल्याचा सीन पाहायला मिळाला. कॅनबेरा येथील संसद भवनात झालेल्या या खास भेटीत कॅप्टन रोहित शर्मा पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करुन देताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करून देताना दिसते. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान सर्वात आधी पर्थच्या मैदानात टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना दिसते. त्यानंतर ते किंग कोहलीकडे वळतात. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात खास संवाद रंगल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते. पर्थच्या मैदानात विराट कोहलीनं केलेल्या शतकी खेळीचं ते तोंडभरून कौतुक करतात. यावर विराट कोहली खास अंदाजात रिप्लाय देतोना पाहायला मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 28-11-2024