Surya Kumar Yadav : सूर्यकुमार यादवला कन्यारत्न!

Surya Kumar Yadav मुंबई: भारताचा टी 20 टीमचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Surya Kumar Yadav ) सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केली आहे. सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टीच्या (Devisha Shetty) घरी लेकीचा जन्म झाला आहे.

यामुळं सूर्यकुमार यादव 10 मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्याला मूकणार आहे. सूर्यकुमार यादवनं सोशल मीडिया पोस्ट करत त्यानं एक्स प्लॅटफॉर्मवर लेकीच्या जन्माची माहिती दिली. ‘हास्य, प्रेमळ मिठी आणि साकार होणाऱ्या स्वप्नांसह, आम्ही आमच्या मुलीचे स्वागत करतो.’ असं सूर्यानं म्हटलं आहे.

सूर्यकुमार यादवची पोस्ट

मुंबई इंडियन्स सोबत सूर्यकुमार यादव रायपूरला रवाना झाला नसल्याची माहिती आहे, त्यामुळं सध्या तो कुटुंबासोबत आहे. आयपीएल 2026 मध्ये सूर्यकुमार यादव खराब फॉर्मचा सामना करत आहे, अशा वेळी वैयक्तिक जीवनात आनंदाचा क्षण आला आहे. सूर्यकुमार यादव 7 मे रोजी बाप झाला असून त्याच्या घरी लेकीचं आगमन झालंय.

सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म संपणार?

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा टी 20 चा कॅप्टन आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं आहे. टी 20 क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांपैकी एक असा सूर्यकुमार यादवचा नावलौकिक आहे. सूर्यानं आयपीएलच्या 2026 च्या हंगामात 10 मॅचमध्ये 195 धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममुळं त्याच्यावर टीका होतेय.

https://e9c85ddc08481d772552b28206db7485.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-45/html/container.html

हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व केलं होतं. लखनौ सुपर जायंटस विरोधात मुंबईनं विजय मिळवला होता. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. या स्थितीत सूर्यकुमार यादव संघात नसणं मुंबईसाठी मोठा धक्का आहे. वैयक्तिक जीवनात आनंदाचा क्षण आल्यानं, लेकीनं जन्म घेतल्यानं सूर्यकुमार यादवला फॉर्म गवसणार का याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 08-05-2026