गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नवरात्र उत्सव गणपतीपुळेची ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात होणार आहे. या निमित्त डोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी गणपतीपुळे येथे श्री चंडिका देवी मंदिरात रात्री साडेनऊ वाजता रंगणार आहे. या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली असून, संबंधित सहभागी संघांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामस्थांनी केले आहे. या स्पर्धेतील संघांसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक व आकर्षक चषक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धेतील उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक व उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी स्पर्धाप्रमुख अमित घनवटकर, सौरभ माने, प्रज्ज्वल गुरव आणि तेजस केदार यांच्याशी संपर्क साधावा व नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:44 PM 26/Sep/2024