राजापुरात पावसाचा शिडकावा

राजापूर : फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला असून, राजापुरात काल पहाटेच्या दरम्यान पावसाचा शिडकाव झाला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. या परिस्थितीमुळे थंडी कमी झाली आहे.

आयएमडीकडून प्राप्त माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा लैंडफॉल तमिळनाडू राज्यात आहे. तेथील कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातुन ओमानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात प्रभाव दिसत आहे. परवापासून हवेत उष्मा जाणवू लागला. थंडीचे प्रमाण कमी झाले होते. राजापूर तालुक्यात काल पहाटेच्या सुमारास काही भागांमध्ये हलक्याशा पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. विचित्र हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावरही होऊ लागलेला आहे. ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 04/Dec/2024

Ratnagiri Khabardar add image