संगमेश्वर : निवेखुर्द परबवाडी केंद्राची सहावी शिक्षण परिषद

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द परबवाडी केंद्राची सहावी शिक्षण परिषद कुंडी शाळेत केंद्रप्रमुख सुनील करंबेळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांच्या मार्गदर्शनाने पार पडली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर कुंडी शाळेच्या विद्यार्थी, शिक्षकांनी प्रार्थना व समूहगीत सादर केले. यावेळी नास परीक्षा सर्वेक्षण पूर्वतयारी विनय होडे, हॅकेथॉन विषयी अरविंद बांबाडे, कॉम्प्युटर सायन्स आणि कोडींग कोर्स रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल स्वप्निल झित्रे, करियर मार्गदर्शन शिक्षिका विलेशा भोसले, प्रशासकिय मार्गदर्शन केंद्रप्रमुख करंबेळे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या परिषदेत तालुका स्तरावर परसबाग स्पर्धेत नंबर मिळवल्याबद्दल हरपुडे नं.२ शाळेचे मुख्याध्यापक शांताराम बावधने, उपशिक्षक सुनील बोडेकर व निबंध स्पर्धेत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिक्षिका प्रज्ञा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या परिषदेला सरपंच दिलीप लोकम, ग्रामपंचायत सदस्या श्रध्दा मांजरेकर, कल्याणी गावडे, पोलिसपाटील धिरेंद्र मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक सावंत, उपाध्यक्ष दिव्यश्री लोकम, सदस्या राजश्री पवार, माजी सैनिक सुरेश सावंत, पालक शिक्षक माता पालक सदस्य केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

परिषद यशस्वी करण्यासाठी कुंडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक ईश्वरा शिंगमोड, स्वप्निल झित्रे, कोरे, पालक, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्वप्निल झित्रे व आभार आत्माराम बने यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 04/Dec/2024

Shanti 4