रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत आज लांजात

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे दि. २७ रोजी लांजा येथे डोळयांच्या पडद्याची समस्या असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच ते दि. २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये तपासणी, शस्त्रक्रिया करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णवेळ रेटिनातज्ज्ञ उपलब्ध नसल्याने इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने ही सुविधा गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू केली आहे. याअंतर्गत शंकर नेत्रालय, चेन्नई येथून प्रशिक्षित, इन्फिगोचे रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया केली आहे.

डायबेटिस झालेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी डॉ. कामत करणार आहेत. रक्तातील अनियंत्रित साखर डोळ्यांवर परिणाम करते. त्याचा परिणाम म्हणजे दृष्टीपटल किंवा रेटिनाला सूज येते, पडद्यावरती रक्तस्राव होतो, पडद्याला छिद्र पडते अशा समस्या येऊ शकतात; पण मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा रेटिनातन्यांकडून तपासणी करून घेतल्यास पुढील धोका टाळता येईल.

रेटिना तपासणी करण्याची व त्यावरील अवघड शस्त्रक्रियासुद्धा येथे केल्या जाणार आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अवघड रेटिना तपासणी केली जाणार आहे.

४० वर्षे पूर्ण झाली असल्यास, अचानक नजर कमी होणे, डोळ्यांपुढे काळे ठिपके असणे, डायबेटिस असल्यास चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास आणि मायनस ३ पेक्षा जास्त नंबरचा चष्मा असल्यास अशांनी रेटिना तपासणी लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेने या सुविधाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 27/Sep/2024