खेड : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही आपला जोर कायम ठेवला. यामुळे जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. खेड- आंबवली मार्गावर जुनाट वृक्ष कुडोशी येथे रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
गुरुवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड – आंबवली मार्गावर जुनाट वृक्ष कुडोशी येथे रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याचवेळी याठिकाणी मांडवे पोलिसपाटील नरेश तांबे व वाडी बेलदार पोलिसपाटील दत्ताराम जाधव हे तेथून प्रवास करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतः झाडी तोडून बाजूला केली. झाड कोसळल्याने रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. अर्धा तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.
तालुक्याच्या ग्रामीण भागात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड – भरणे मार्गावरील गटारे तुंबल्याने या मार्गावरील महाड नाका नजीक रस्त्यावर पाणी आले होते. सांयकाळी उशिरा पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रशासनाकडून देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 27/Sep/2024