सावर्डे-डेरवण रुग्णालय रस्त्याची बिकट अवस्था

सावर्डे : झपाटयाने विकसित होत असलेल्या सावर्डे ग्रामपंचायत हद्दीतील सावर्डे ते डेरवण रुग्णालय रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्याचा त्रास विद्यार्थी, रुग्णालयाकडे जाणारे कर्मचारी, पाद‌चाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही होत आहे. रस्त्याचीही हानी होत आहे. गजबजलेल्या या रस्त्याची पावसाळ्यातील अवस्था पाहिली की, या रस्त्याला कोणी वाली आहे का, असा प्रश्न पडतो.

सावर्डेपासून दुर्गवाडीकडे जाणारा हा सार्वजनिक बांधकाम खात्याया रस्ता खूपच वर्दळीचा आहे. सह्याद्री शिक्षणसंस्थेमुळे बनलेले विविध अभ्यासक्रमाचे शैक्षणिक केंद्र सर्व सोपोनियुक्त क्रीडासंकुल, डेरवण येथील शिवसृष्टी आदी कारणांनी या रस्त्यावर रुग्णालयापर्यंत दुतर्फा चार-चार माळ्यांची निवासी संकुले उभारली आहेत. त्यामध्ये आणखी भर पडत आहे. वीस ते पंचवीस किमी परिघातील लोक नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने या निवासी संकुलात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा रस्ता डेरवणफाटा ते वालावलकर रुग्णालय दिवसभर गजबजलेला असतो. त्या मानाने संबंधित खात्याने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. रस्त्याच्या बाजूपट्ट्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. वालावलकर रुग्णालयासमोर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सत्याच्या दोन्ही बाजूस नाले नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, हे पाणी रस्त्यावरून सखल भागाकडे वाहताना दिसते. हे पाणी कुडपफाटा, शेजारील निवास संकुल व वरदायिनी हॉटेलसमोरील सखल भागात साचते. या पाण्यातूनच शालेय विद्यार्थी, रुग्णालयाचे कर्मचारी, रुग्ण, आदींना जीव मुठीत घेऊन मार्ग काढ़त जावे लागते. पावसाचे पाणी या खड्यात साचल्याने वाहनचालकांना खड्याचा अंदाज येत नाही. अनेकदा या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत विशेषकरून पादचारी व विद्याध्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते.

सकाळी नऊ वाजता या रस्त्यावर वाहने व पादचाऱ्यांची खूप वर्दळ असते. रस्ताही अरुंद आहे. पायी जात असताना खड्यातील पाणी चुकवत शाळेत पोहचावे लागते. प्रशासनाने रस्ता रुंद करून नाले काढण्याची गरज आहे. श्रीशा घडशी, विद्यार्थिनी

रस्ता उंच सखल आहे. त्यातच दोन्ही बाजूस गटारे नसल्याने पावसात वाहन चालविणे जिकिरीचे आहे. लहान लहान मुले शाळेत जात असतात, अशावेळी फार सावधगिरी बाळगावी लागते. प्रतीक सुर्वे, वाहनचालक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 27/Sep/2024