परतीच्या पावसाचा हळव्या भात पिकाला फटका

रत्नागिरी : परतीच्या पावसाने जिल्ह्याला परिसराला झोडपले असून, या पावसामुळे हळव्या भातशेतीचे नुकसान होण्याचा धोका आहे. सलग तीन दिवस परिसरात पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू झाला असून, सायंकाळीदेखील पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवामानात मोठा गारवा जाणवत होता. या पावसामुळे भातशेती अडचणीत आली असून, हळव्या भातशेतीवर परतीच्या पावसाचा मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हळव्या भातशेतीला मोठा फटका बसणार आहे. तसेच भातशेतीवर करपा रोगदेखील पडला असून, कृषी खात्याने याची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 27-09-2024