रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान “मत्स्यालय व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवशाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये गोड्या पाण्यातील व सागरी शोभिवंत मासे ओळख, बीजोत्पादन व संवर्धन साठी लागणरा टाक्यांची बांधणी कशी करावी, शोभिवंत मासे बीजोत्पादन कसे करावे, जीवंत व कृत्रिम खाद्य निर्मिती, दर्जेदार बीज कसे ओळखावे, मत्स्यालयासाठी लागणारी उपकरणे व मांडणी, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल, बँकांच्या विविध योजना, व्यवसाय सुरू करण्यास उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना याबाबत सविस्तर माहिती तज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकल्पावर भेट आयोजीत करण्यात येते.

या प्रशिक्षण कार्यक्रम अधिक माहितीसाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, रत्नागिरी येथे प्रा. नरेंद्र चोगले (९४२११४०१४४), डॉ. हरिष धमगाये (९५११२९५८१४) किंवा प्रा. साटम (९५५२८७५०६७) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक (८२७५४५४८२१) यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:36 PM 27/Sep/2024