बांधकाम करताना दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने तरुण जखमी

रत्नागिरी : घराच्या बांधकामाच्या सेन्ट्रींग लाकडी पट्या काढत असताना तरुण २० फुटावरुन पडला. त्याला मुका मार लागला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. शंकर दादासो लोहार (वय ४२, रा. खेडशी नाका, रत्नागिरी. मुळ: पाटण, सातारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी साडेदहाच्या सुमारास गोडावून स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर लोहार हे निखिल सावंत (रा. गोडावून स्टॉप, रत्नागिरी) यांच्या घराचे काम करत होते. बांधकामाला लावलेल्या सज्याच्या लाकडी पट्या काढत होता. अचानक पाय सरकल्याने ते दुसऱ्या मजल्यावरुन पडले. त्यांना मुका मार लागला तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 11-12-2024