मठ येथे आजपासून श्रीदत्त जन्मोत्सव

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील मठ येथील श्रीक्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्री दत्तदेवस्थानतर्फे १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळी आठ ते नऊ या वेळी श्रींची महापूजा व अभिषेक, ९ ते दुपारी एक श्रीदत्त याग, आरती, १.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायं. ३.३० ते ५ या वेळेत भजन, साडेसात ते रात्री दहा वाजता आरत्या, भोवत्या व छबिना होईल. १३ ला सकाळी ८ ते ९ श्रींची महापूजा व अभिषेक, ९ ते दुपारी १ श्रीदत्तयाग, आरती.

१ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ भजन, सायं. ७ ते ७.३० वा. आरती, साडेसात ते नऊ वाजता हरिपाठ, रात्री १० ते १२ भोवत्या, छबिना. १४ ला सकाळी ८ ते ९ श्रींची महापूजा, ९ ते १ श्री दत्तयाग, आरती, दीड ते तीनपर्यंत महाप्रसाद, ३ ते ४.३० वा.

भजन, सायं. ५ ते ७ या वेळेत भजन, श्रींचा जन्मोत्सव सोहळा आणि कीर्तन होईल. रात्री साडेदहा ते बारा आरत्या, भोवत्या व छबिना आणि मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. सर्व कार्यक्रमांना श्री दत्तभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 12-12-2024

Ratnagiri Khabardar add image