रत्नागिरी : शासन निर्णयान्वये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचे वतीने सन २०२४-२५ या शैक्षणीक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्येक्रम सन २०२४-२५ आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ४९ खेळ समाविष्ट करण्यात आले आहेत,
त्या पैकी रायफल शूटींग खेळाची स्पर्धा दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी, एस.व्ही.जे.सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण, चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले मुली, 17 वर्षाखालील मुले मुली आणि 19 वर्षाखालील मुले मुली असे वयोगट वार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तेथे 10 मीटर पिस्तूल, ओपन साईट रायफल व पीप साईट रायफल असे तीन प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले.
चि. ऋग्वेद सिध्दांत बेंडके हा G.G.P.S. शाळे तर्फे १४ वर्षा खालील पिस्तूल गटातून स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने उत्कृष्ट कामगिरी करतं द्वितीय स्थान पटकावले व कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत तो रत्नागिरी चे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याने G.G.P.S. शाळा प्राचार्य व क्रीडा शिक्षकांचे आभार मानले आणि पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी च्या सौ. राजेश्वरी पुष्कराज इंगवले ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्या बद्दल विशेष आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 28-09-2024