रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, प्रशासन सज्ज होऊ लागले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी बीएलओंसाठी शनिवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ते बारा दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी रत्नागिरी विधानसभेसाठी ३८२ बीएलओ आणि १२ सुपरवायझर यांच्यासाठी सावरकर नाट्यगृहात प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 28-09-2024